खालील शब्दांतील 

धातुसाधित विशेषण कोणते?

  1. स्वप्नाळू मुलगा
  2. लबाड कोल्हा
  3. निरोगी मूल
  4. पडका किल्ला
  5. यापैकी एकही नाही

Answer (Detailed Solution Below)

Option 4 : पडका किल्ला

Detailed Solution

Download Solution PDF
उत्तर- पडका किल्ला 
Key Points
विशेषण
  • नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' असे म्हणतात. 
  • विशेषण हे साधारणपणे नामापूर्वी येते. 
  • उदा. 'पाच पिशव्या' या शब्दसमूहात 'पिशवी' हे नाम आहे. आपल्याला पिशव्यांविषयी बोलावयाचे आहे. त्या पिशव्यांची संख्या 'पाच' असे सांगून आपण संख्या सांगितली व 'पाच निळ्या पिशव्या' असे म्हटले, तर पिशव्यांविषयी माहिती सांगून आपण ती मर्यादित केली. म्हणून 'पाच', 'काळ्या' हे शब्द इथे विशेषण म्हणून आले आहेत. 
  • विशेषणांचे मुख्य प्रकार ३ आहेत- १. गुणविशेषण २. संख्याविशेषण ३.सार्वनामिक विशेषण
  • नामे, धातुसाधिते व अव्ययसाधिते यांचादेखील विशेषणांसारखा उपयोग केला जात असून त्यांना अनुक्रमे नामसाधित विशेषणे, धातुसाधित विशेषणे आणि अव्ययसाधित विशेषणे असे म्हणतात. 
वरील प्रश्नातील 'पडका किल्ला' या पर्यायातील 'पडका' हे धातुसाधित विशेषण आहे. 
Important Pointsधातुसाधित विशेषणे
  • पिकलेला आंबा, धावणारी मुलगी, बोलका पोपट, पडका किल्ला या शब्दांतील 'पिकलेला, धावणारी, बोलका, पडका' हे शब्द त्यांच्यापुढे क्रमाने येणाऱ्या नामांची विशेषणे आहेत. 
  • पण ही विशेषणे 'पिक, धाव, बोल, पड' या धातूंपासून बनलेली आहेत. 
  • अशा विशेषणांना 'धातुसाधित विशेषणे' असे म्हणतात. 

More शब्दांच्या जाती Questions

More शब्द Questions

Hot Links: teen patti master update rummy teen patti teen patti all app teen patti master app